Sunday, February 5, 2012

Pani re Pani

पाणी हे जीवन असते
का जीवन पाण्यासारखे असते ।।

पाण्याशिवाय करमत नसते
त्यामुळे गाव पाण्याशेजारी वसते ।।

पाणी ज्या रंगात मिसळते
ते त्या रंगासारखे दिसते ।।

पाण्याच्या या स्वभावामध्ये
एकात्मतेच प्रतिक असते ।।

पण . . .

चाळीच्या नळावरती जेव्हा पाण्यासाठी रांग लागते  तेव्हा . . .
याच एकात्मतेच्या चिंध्या उडवीत
कळशी हंड्याशी भांडते . . . . .।।

Sameer Kashikar